छ. संभाजीनगर - एक नई उडान महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी गरब्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)कन्नड येथील सौ.पूर्णकाकू कोल्हे महिला प्रबोधनीमध्ये एक नई उडान महिला मंडळ च्या वतीने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय गरबा आणि दांडिया कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ​या रंगतदार कार्यक्
अ


छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)कन्नड येथील सौ.पूर्णकाकू कोल्हे महिला प्रबोधनीमध्ये एक नई उडान महिला मंडळ च्या वतीने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय गरबा आणि दांडिया कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​या रंगतदार कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गरबा आणि दांडियाच्या तालावर मनसोक्त नृत्य करत रास गरब्याचा आनंद घेतला. यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांसाठी विविध प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली होती.

​सर्वोत्कृष्ट दांडिया नृत्य , सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि लहान मुलांसाठी विशेष बक्षीस वितरण सोहळा पार पडला‌ व ​यावेळी एक नई उडान महिला मंडळ च्या संपूर्ण टीमने यासाठी परिश्रम घेतले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande