छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.)।
नागरिकांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता असणे गरजेचे असल्याचे मत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. स्वतःचे आरोग्य प्रत्येक नागरिकांनी सांभाळायला हवे यासाठी व्यवस्थित आहार देखील आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” व “नमो नेत्र संजीवनी” या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार चव्हाण बोलत होत्या.
हे जनकल्याणकारी उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, आडत बाजार येथे संपन्न झाले.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे व सेवा भाव वृद्धिंगत करणे हा आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी श्री.जितेंद्र जयस्वाल, श्री.सांडूअण्णा जाधव, अध्यक्ष श्री.गोपाल वाघ, श्री.राजू तुपे, श्री.कृष्णा सोटम व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis