लातूर - अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुकचे ८० वर्षीय वृद्ध बेपत्ता
लातूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुकचे ८० वर्षीय वृद्ध बेपत्ता असून वाकी नदीत वाहून गेल्याचा संशय, प्रशासनाकडून शोध सुरू आहे ​तालुक्यातील मौजे नांदुरा बुद्रुक येथील वयोवृद्ध नागरिक ज्ञानोबा रामा जटुरे (वय वर्ष ८०) हे घर
अ


लातूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुकचे ८० वर्षीय वृद्ध बेपत्ता असून वाकी नदीत वाहून गेल्याचा संशय, प्रशासनाकडून शोध सुरू आहे

​तालुक्यातील मौजे नांदुरा बुद्रुक येथील वयोवृद्ध नागरिक ज्ञानोबा रामा जटुरे (वय वर्ष ८०) हे घराबाहेर पडले तेव्हापासून ते बेपत्ता असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

​ज्ञानोबा जटुरे यांचा गावकरी आणि कुटुंबीयांकडून शेतशिवारात, गावात कसून शोध घेण्यात आला. मात्र, अद्याप त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीमुळे ते वाकी नदीत वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

​नागरिकांकडून प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली असता, प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली. तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी तातडीने अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली.

वाकी नदीच्या साठवण तलावात बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात मात्र योवृद्ध नागरिकाच्या अचानक बेपत्ता होण्याने नांदुरा बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande