रत्नागिरी : जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापतिपदांचे आरक्षण जाहीर
रत्नागिरी, 30 सप्टेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे हिच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापतिपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्
सभापती आरक्षण तक्ता


रत्नागिरी, 30 सप्टेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण आज जाहीर झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे हिच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापतिपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये दापोलीचे सभापतिपद नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव झाले आहे. अन्य आरक्षण असे - राजापूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी सर्वसाधारण, मंडणगड संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठरले.

बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार मीनल दळवी हे अधिकारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रथम माहिती दिली. त्यानंतर अनन्याच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande