छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
सावळदबारा ता सोयगाव गावातील रस्त्याच्या अतिक्रमण काढण्यासाठी भरत नप्ते, संदीप आप्पा काळे, अभय पुजारी, प्रदीप काळे, मिथुन गावडे आदींसह 20- 25 युवकांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. बेमुदत उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची
भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली.
त्या ठिकाणाहून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वांचा विषय उद्यापर्यंत मार्गी लावण्याची विनंती केली. हा प्रश्न मिटवावा असे आवाहन त्यांनी केले आहे
उपोषणकर्त्यांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव सुरेश बनकर ,सोयगाव नायब तहसीलदार श्री.संभाजी देशमुख, फर्दापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री साबळे विस्तार अधिकारी श्री दौंड ग्रामसेवक यन्नमवार,तलाठी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis