ठाणे, 30 सप्टेंबर (हिं.स.) : ठाण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अमेझॉनच्या ‘प्रतिधि शिष्यवृत्ती’ योजनेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अमेझॉन इंडियाच्या ऑपरेशन्स (पश्चिम) विभागाच्या संचालक गीता उप्पल विशेष उपस्थित होत्या.
या उपक्रमाअंतर्गत देशभरातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन दिले जात आहे. आजपर्यंत 7 शहरांतील सुमारे 7,800 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकले असून, यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रतिधी शिष्यवृत्तीमुळे अनेक गरजू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात पुढे जाण्याची संधी मिळाली असून, यामार्फत आतापर्यंत 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची मदत पोहोचवण्यात आली आहे.
कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, शिक्षण ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे. अमेझॉनसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणासाठी पुढाकार घेतल्याने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत असल्याचे ते म्हणालेत.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी