लातूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.) नुकत्याच झालेल्या लातूर जिल्ह्यातील मन्याड नदीच्या महापुरामुळे गावांवर (सुनेगाव, शेंद्री, शेनी) मोठे संकट आले. या पुरात पाणीपुरवठा करणारी संपूर्ण यंत्रणा वाहुन गेल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.या बिकट परिस्थितीत सरपंच श्री. गोपीनाथ जायभाये यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता जनहितासाठी तातडीने पाऊले उचलली ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत असलेल्या शेनी या गावासाठी कोणतीही दिरंगाई न करता, टँकरद्वारे पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात आला तसेच सुनेगाव व शेंद्री या गावांना पुरामुळे नदीवरील पूल आणि रस्ता वाहुन गेल्याने टँकर पोहचू शकत नव्हते. अशा वेळी, सरपंच यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन या दोन्ही गावांची तात्पुरती सोय केली.संकट मोठे असले तरी, त्यापेक्षा मोठे आमचे नेतृत्व आहे. संवेदनशीलता, कार्यक्षमता आणि संकटकाळात दाखवलेल्या या उत्कृष्ट नेतृत्वामुळे सरपंच गोपीनाथ जायभाये यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis