मुंबई : गोरेगावमध्ये भीषण आग, तिघांचा मृत्यू
मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.) : मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगरमध्ये एका घराला शनिवारी, पहाटे 3 वाजेच्या सुमाराला आग लागली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. घराला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबईत शनिवारी पहा
आग-लोगो


मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.) : मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगरमध्ये एका घराला शनिवारी, पहाटे 3 वाजेच्या सुमाराला आग लागली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. घराला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबईत शनिवारी पहाटे भगतसिंग नगरमधील एका घराला आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. पण घरात झोपलेल्या तिघांना वाचवता आले नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही आग आटोक्यात आणली. मात्र घरात झोपलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला, ज्यामध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande