
रत्नागिरी, 10 जानेवारी, (हिं. स.) : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य तसेच माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. व्ही. के. बावडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चाळिसाव्या विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये हे व्याख्यान दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. ज्येष्ठकीटक तज्ज्ञ व मित्रकिडा बायोसोल्यूशन्स आणि मित्रकिडा फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक डॉ. राहुल मराठे व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानासाठी सर्व विज्ञान तसेच निसर्गप्रेमी नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी