
नांदेड, 10 जानेवारी, (हिं.स.) - शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेची महत्वपूर्ण बैठक संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको नांदेड येथे ११ जानेवारी रोजी दुपारी १२. ३० वाजता आयोजीत करण्यात आली आहे. सदरील बैठक ही शिवा संघटनेच्या ३१ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित करण्यात आली आहे.
शिवा संघटनेचा वर्धापन दिन २८ जानेवारी रोजी लातूर जिल्ह्यातील कासार शिरसी या ठिकाणी पार पडणार आहे. त्या संदर्भाने पुर्व तयारीसाठी तसेच यावेळी नांदेड वाघाळा महानगपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीस राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, प्रदेश प्रवक्ते विठ्ठल ताकबीडे, जिल्हा संपर्क प्रमुख इंजी. अनिल माळगे आदींची उपस्थीती रहाणार आहेत.
त्यामुळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहण्याचे आवहान जिल्हाप्रमुख विलास कापसे, संभाजी पाटील, शुभम घोडके, नंदुआप्पा देवणे, सिद्धेश्वर स्वामी जवळेकर, सौ. नंदाताई पाटील, सौ. सत्यभामा येजगे, महानगर प्रमुख गजानन कानडे, शहरप्रमुख शिवराज उमाटे, विजय हिंगमीरे, सदाशिव माताळ, आदींनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis