
कोल्हापूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
रुग्णालय, डॉक्टर याबरोबरच मेडिकल लॅबोरेटरी हा आरोग्य व्यवस्थामध्ये महत्वाचा कणा आहे असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी अनालिसिस अँड प्रॅक्टिशनर( अक्लॅप) महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी आज येथे केले.
अक्लॅप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने आयोजित कै. अण्णासाहेब करोले स्मृती परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल शहर अध्यक्ष संजय चितारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित या परिषदेसाठी राज्यभरातून 2000 प्रतिनिधी उपस्थित आहेत. ही परिषद दोन दिवस चालणार आहे.
प्रास्ताविक संघटनेचे सचिव रमेश चौगुले यांनी केले.
संजय चितारी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये अक्लॅप ही
वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी संघटना निर्माण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केले.संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रशांत गुळवणी म्हणाले,संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब करोले यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपले काम सुरू आहे. त्यांनी फक्त संघटना निर्माण केली नाही तर आपल्या प्रत्येकाला स्वाभिमान दिला आहे आत्मसन्मान दिला आहे आणि अस्तित्वासाठी लढण्याची जाणीव ही त्यांनी करून दिली त्यामुळेच आज ही संघटना एवढ्या मोठ्या ताकतीने उभी आहे. मेडिकल लॅबोरेटरी क्षेत्रात आपण दररोज प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत असतो. ही संघटना कोणत्याही सुधारणांच्या विरोधात नाही पण आपल्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी संघटनेची धडपड आहे मेडिकल लॅबोरेटरी व्यावसायिकांचे कार्यक्षेत्र कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये यासाठी संघटना ठाम आहे.
या परिषदेमध्ये डॉ. दीपक सावंत यांचे कॉलिटी कंट्रोल, डॉ. वरून बाफना यांचे रक्त रोगावर व डॉ. स्नेहलदीप पाटील यांचे बायोकेमिकल तपासणी याच्यावर व्याख्यान झाले
उद्घाटन कार्यक्रम वेळी यावेळी डॉ. गिरीश शरणाते, कृष्णा साठे, राजेंद्र बगुल , उमेश सोनार, राजेश गरुड, जिल्हाध्यक्ष शरद एकल, परिषद सेक्रेटरी पंडित जाधव, राजेंद्र निगवे, मुकुंद पाणारी, राजीव पाटील, सागर बर्गे, समीर जमादार,बाहुबली पाटील, धनंजय वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar