
अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)।
नगरपालिकेच्या निकालाचे पडसाद आता थेट महानगरपालिकेच्या राजकारणात उमटू लागले आहेत.अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएम यांच्यात झालेली अभद्र युती अखेर तुटली आहे. मात्र या युतीला तोडण्यामागे काँग्रेसची अस्वस्थता कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केला आहे.अकोट नगरपरिषदेत एमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आल्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने या युतीवर टीका करत दबाव निर्माण केला आणि त्यामुळेच भाजप–एमआयएम युती तोडण्यात आल्याचा दावा एमआयएमकडून करण्यात येत आहे.
याशिवाय, अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतही एमआयएमचे अनेक उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.या संपूर्ण राजकीय घडामोडींवर जनता 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका मतदानात काँग्रेसला उत्तर देईल, असा दावा एमआयएमच्या नगरसेवकांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे