सेलूतील राजवाडीत ट्रॅक्टर जप्त, तहसील कार्यालयात जमा
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)। महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सेलू तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाई केली आहे. राजवाडीत ट्रॅक्टर जप्त करून सेलू तहसील कार्यालयात जमा केले आहे. सेलूचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली मौज
सेलूतील राजवाडीत ट्रॅक्टर जप्त, तहसील कार्यालयात जमा


परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।

महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सेलू तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाई केली आहे. राजवाडीत ट्रॅक्टर जप्त करून सेलू तहसील कार्यालयात जमा केले आहे. सेलूचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे राजवाडी येथे अवैध गौणखनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालय, सेलू येथे जमा करण्यात आले आहे. ट्रॅक्टरचा क्रमांक MH-38 B-5540 आहे. ही कारवाई तलाठी भास्कर काकडे व दीपक गांगुर्डे यांनी केली.

उपविभागीय दंडाधिकारी श्री. लाहोटी यांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande