नांदेडच्या बिलोली पालिकेत उपनगराध्यक्षपदी अनुप अंकुशकर यांची दुसऱ्यांदा निवड
नांदेड, 10 जानेवारी, (हिं.स.) - बिलोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अनुप अर्जुनराव अंकुशकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यावेळी नगरपालिकेच्या २० नगरसेवकांच्या संख्येनुसार दोन स्वीकृत सदस्यही निवडण्यात आले आहेत. स्वीकृत सदस्य म्हणून ऊमेश बिलोलीक
बिलोली पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अनुप अंकुशकर यांची दुसऱ्यांदा निवड


नांदेड, 10 जानेवारी, (हिं.स.) - बिलोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अनुप अर्जुनराव अंकुशकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यावेळी नगरपालिकेच्या २० नगरसेवकांच्या संख्येनुसार दोन स्वीकृत सदस्यही निवडण्यात आले आहेत. स्वीकृत सदस्य म्हणून ऊमेश बिलोलीकर आणि अखिल सिद्दीकी यांची निवड झाली आहे.

नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नगर पालिकेच्या सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली होती, जिथे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. अनुप अंकुशकर हे प्रभाग क्र. ९ मधून मराठवाडा जनहित पार्टीतर्फ निवडून आले असून, पालिकेत त्यांचा अनुभव आणि पूर्वी उपाध्यक्ष म्हणून कामगिरी पाहता ही निवड अपेक्षितच होती.

नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी म्हणाले की, 'शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागील काळात पालिकेत प्रशासक कार्यकाळ असल्यामुळे अनेक योजना रुळावर यायला वेळ लागला, पण आता बॅकलॉग भरून काढून शहरवासीयांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देऊ.'

अनुप अंकुशकर हे मागील काळात नगरसेवक, विरोधी पक्षनेते आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहेत. त्यामुळे त्यांची उपाध्यक्ष म्हणून कारकीर्द पुढील काळातही विकासात्मक राहील अशी चर्चा शहरात सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande