
परभणी, 10 जानेवारी, (हिं.स.)। परभणी येथील सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी रविवार 11 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी विधी महाविद्यालयात ‘विचार उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांचे ‘फुले शाहू आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.
यावेळी पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांना ‘सम्यक जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भीमराव खाडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विद्रोही फाऊंडेशन, सम्राट मित्र मंडळ आणि शाक्य नगर महिला मंडळ यांना आदर्श भिमजयंती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, प्रा. डॉ. सुरेश हिवराळे, यशवंत मकरंद, प्रा. डॉ. सुरेश शेळके, प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य सारंग साळवी, त्र्यंबक वडसकर आदींनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis