असदुद्दीन ओवेसी यांची 11 जानेवारीला परभणीत जाहीर सभा
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)। परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एआयएमआयएम पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणार्‍या 18 उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची 11 जानेवारी रोजी परभणी शहरात
बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची 11 जानेवारीला परभणीत जाहीर सभा


परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।

परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एआयएमआयएम पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणार्‍या 18 उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची 11 जानेवारी रोजी परभणी शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

बॅरिस्टर ओवेसी हे सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरद्वारे पोलीस मुख्यालय मैदानावर आगमन करतील. त्यानंतर ते थेट दर्गा रोडवरील तुराबुल हक मैदान येथे जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. या सभेला माजी खासदार इम्तियाज जलील तसेच हैद्राबाद येथील बहादुरपुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहम्मद मुबीन यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या भव्य प्रचार सभेस परभणी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्ध उद्योजक तथा जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande