बीड : टाकळगाव येथे बलभीम महाविद्यालयाचे एनएसएस वार्षिक हिवाळी शिबिर संपन्न
बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा त योजना विभाग व ग्रामपंचायत टाकळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे टाकळगाव येथे विशेष वार्षिक हिवाळी शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांच्या मार्
टाकळगाव येथे बलभीम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक हिवाळी शिबिर


बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा त योजना विभाग व ग्रामपंचायत टाकळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे टाकळगाव येथे विशेष वार्षिक हिवाळी शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

या समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब कोकाटे बोलत होते. मंचावर उद्घाटक म्हणून सहाय्यक कार्यकारी अभियंता सोमिनाथ सदगर, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब गव्हाणे, सरपंच एम. आर. कदम, उपसरपंच व्ही. एस. गव्हाणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपप्राचार्य डॉ. संतोष डुबल, कार्यालय अधीक्षक किसन सागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरातून राष्ट्रीय एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, श्रमसंस्कार यासोबतच नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे कामही केले जाते. वर्तमानात निसर्ग धोक्यात आलेला असून पृथ्वीचे फुप्फुस कमजोर होत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे अतिवृष्टीसारखे संकटे येत आहे. पर्यावरणाचा बिघडलेला हा समतोल राखण्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करावी लागणार असल्याचे प्रतिपादन बलभीम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब कोकाटे यांनी केले.

उद्घाटकीय मार्गदर्शनात सोमिनाथ सदगर म्हणाले की, बलभीम महाविद्यालयाचे वार्षिक हिवाळी शिबिर गावाच्या विकासाला हातभार लावणारे असून या शिबिरात राबविण्यात येणारे उपक्रम हे गावाला स्वच्छता व आरोग्याचे महत्व सांगणारे आहे तसेच या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होऊन त्याला समाजभान प्राप्त होते व तो घडतो.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande