बीड, परळीत १५ जानेवारीला ठरणार उपनगराध्यक्ष
बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष पद व स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी राजकारणा तापले आहे. धारुर नगर परिषदेत १३ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा बोलावली गेली आहे तर, बीड व परळीत १५ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्विकृ
बीड


बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष पद व स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी राजकारणा तापले आहे. धारुर नगर परिषदेत १३ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा बोलावली गेली आहे तर, बीड व परळीत १५ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. परळीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झाल्याने इथे भाजपला उपाध्यक्ष पदाची संधी मिळू शकते. धारूरमध्ये आ. प्रकाश सोळंके ठरवतील त्याच्याच गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडेल.

बीड जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकांनी यावेळी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असल्याने राष्ट्र‌वादी काँग्रेससाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली होती. त्यात राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीतून डॉ. योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला होता. रंगतदार झालेल्या लढतीत राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्ष झाल्या. भाजपचे १५, राष्ट्रवादीचे १९, शिवसेनेचे ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व एमआयएम या पक्षाचे प्रत्येकी १ नगरसेवक निवडून आले.

परळी नगरपालिकेत उपाध्यक्ष पदाची निवड १५ जानेवारी रोजी निवड होणार आहे. उपाध्यक्षपद भाजपाकडे जाणार की

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे ठेवणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. ३५ सदस्यसंख्येच्या परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपाचे ७, शिवसेना शिंदगटाचेर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचेर, काँग्रेस, एमआयएम प्रत्येकीर १ आणि आणि अपक्ष उ शरद पवार गटाचेर, क ६ असे बलाबल आहे. गटनेता निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम असा २४ जणां भाजपा-अपक्ष असा९ जांचा एक गट स्थापन झाला. असा २४ जणांचा एक गट तर उपाध्यक्षपद धनंजय मुंडे हे कुणाला देतात याकडे लक्ष आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष व विषय समिती सभापतीपदासाठीचा बहुमताचा आकडा बीड पालिकेत कुणालाही मिळाला नाही. स्वीकृत सदस्यांसाठी नेत्यांकडे लॉबिंग सुरू आहे.

बीड नगर पालिकेसह धारुर, परळी या नगरपालिकांमध्येही स्विकृत सदस्य पहिल्याच सभेत निवडले जाणार आहेत. त्यांची नावे एक दिवस आधीच कळवावी लागणार आहेत. त्यामुळे आपलीच यासाठी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्यांनी उमेदवारी मागे घेतली त्यांनी जोर लावला आहे तर काही पराभूतही मागच्या दाराने पुन्हा सभागृहात जाता यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. जातीय समिकरणांचाही विचार केला जात आहे.

धारूर पालिकेची पहिली सर्वसाधारण बैठक १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. धारूर नगरपालिकेत एकूण २० नगरसेवक आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, भाजपाचे ६ तर शरद पवार गटाचे ३ नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत आहे. पालिकेतील सत्ताकेंद्र आ. प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असल्याने, उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याबाबत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पक्षांतर्गत समन्वय, स्थानिक गटबाजी व जातीय समिकरणांचा विचार करुन उमेदवार ठरवला जाईल.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande