
चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
जिल्हा मराठी भाषा समिती, चंद्रपूर यांच्या वतीने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी
दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी देखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
चंद्रपूर जिल्हा मराठी भाषा समितीच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या अनुषंगाने मराठी पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे नियोजित आहे. चंद्रपूर जिल्हयातील साहित्यिकांना आपली पुस्तके प्रकाशित करावयाची आहेत, अशा लेखकांनी 11 जानेवारी पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा मराठी भाषा समिती, चंद्रपूर यांच्या 9923694060 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विहित मुदतीनंतर प्राप्त होणा-या विनंतीचा स्विकार केला जाणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्यिक व रसिक वाचकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव