चंद्रपूर : भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का - विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत पातळी सोडून वक्तव्य सुरू आहे.पुणे महापालिका निवडणुकीत सत्तेतील नेते एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत आहे. हे आता तलवारी घेऊन एकमेकांच्या अंगावर जाणेच उरले आहे.औकात काढत आहे सत्ता सर्वोच्च आहे, विच
चंद्रपूर : भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का - विजय वडेट्टीवार


चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.)।

महापालिका निवडणुकीत पातळी सोडून वक्तव्य सुरू आहे.पुणे महापालिका निवडणुकीत सत्तेतील नेते एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत आहे. हे आता तलवारी घेऊन एकमेकांच्या अंगावर जाणेच उरले आहे.औकात काढत आहे सत्ता सर्वोच्च आहे, विचार दिसत नाही.पोलिस वापर करून, गुंडाना वापर केला जातो आहे. गुंडांना बघून जनता घाबरली आहे. तेव्हा भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का असा सवाल

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.

मतासाठी हिंदू- मुस्लिम बोंबाबोंब करतात आणि एमआयएम बरोबर युती करतात,निवडणुकीत धर्माचा वापर केला जात आहे. उघडपणे धर्म आणि जातीय वक्तव्य करण्यात येत निवडणूक आयोग मेला आहे का? अस्तित्व नाही का? सत्ताधाऱ्यांचा गुलाम झाला आहे का? थोडी लाज आहे का? एक मंत्री बोलतो महापालिका महापौर जय श्री राम बोलणार बसणार यावर कारवाई का होत नाही? आचारसंहिता लागू असताना अशी वक्तव्य करून कारवाई होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, तर पुरोगामी विचारांचे काय, की फक्त निवडणुकी पुरता एकत्र आले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत तू मारल्यासारख कर मी रडल्यासारखं करतो, असे नाटक सुरू आहे. काय सुरू आहे राजकारणात कळत नाही. इतके घाणेरडे वातावरण भाजपने महाराष्ट्रात केले असल्याचा आरोप आ.वडेट्टीवार यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande