चंद्रपूर : राष्ट्रवादीची विदर्भ किसान मजदूर काँग्रेसशी आघाडी
चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट )शहरातील महत्वपूर्ण म्हणून गणल्या जाणाऱ्या विदर्भ किसान मजदूर काँग्रेसशी आघाडी केली आहे. परिणामी शहर महापालिकेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. दरम्यान शहर महापालिका निवडणुकीच्
चंद्रपूर : राष्ट्रवादीची विदर्भ किसान मजदूर काँग्रेसशी आघाडी


चंद्रपूर, 10 जानेवारी (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट )शहरातील महत्वपूर्ण म्हणून गणल्या जाणाऱ्या विदर्भ किसान मजदूर काँग्रेसशी आघाडी केली आहे. परिणामी शहर महापालिकेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. दरम्यान शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला जाहीरनामा याच आघाडीच्या वतीने शुक्रवारी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शुक्रवारी घोषित केला आहे.

चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी १७ प्रभागातून ६६ जागांसाठी निवडणूक होत आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजपसह काँग्रेसनेही अनेकांना उमेदवारी डावलल्याने शहरातील सर्वच बहुतांश प्रभागांत निष्ठावंतांनी बंडाचे हत्यार उपसले. त्यामुळे बंडखोरांचा फटका दोन्ही पक्षांना मोठ्या पक्षांना बसणार आहे. ८३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात आता

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) शहरातील महत्वपूर्ण म्हणून गणल्या जाणाऱ्या विदर्भ किसान मजदूर काँग्रेसशी युती केली असून ते ४० जागा लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर हे सर्व या आघाडीचे उमेदवार लढत असल्याची माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिली. उर्वरित सुमारे १२ उमेदवारांना पाठिंबा दिलेला असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजीव कक्कड व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल पुगलीया हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपला जाहीरनामा घोषित केले. त्यातून देशातील चंद्रपूर महानगर या चौथ्या क्रमांकावर असलेल्या प्रदूषित व अधिकतम तापमान असलेल्या शहराला प्रदूषण व तापमान मुक्त करण्याकरिता उपाययोजना करण्यासह शहरातील विविध समस्या व विकास कामे करण्यावर यातून भर देण्यात आलेला आहे.

शहरातील खास करून झोपडपट्टीतील व इतर भागातील लोकांना राहते कच्चे घर दिल्ली महापालिकेप्रमाणे ३०० फुटाच्या घराला मालमत्ता करातून शंभर टक्के सूट देण्यात येईल व तीनशे फुटाचे वर आणि पाचशे फुटाचे आत असलेल्या कच्चा राहत्या घरांना ५० टक्के मालमत्ता करातून सूट देण्यात येईल, चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता व आवश्यकतेनुसार नूतनीकरण देखील करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande