
नाशिक , 10 जानेवारी, (हिं.स.) - भाजपा नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रविवारी नाशिक मध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी विशाल सभा होणार आहे या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.
राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नाशिक महानगरपालिकेचा देखील समावेश आहे नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये आपले मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याबरोबर सहभागी असली तरी देखील नाशिकमध्ये स्वतंत्र पद्धतीप्रमाणे 118 उमेदवार उभे केले आहे.
नाशिक मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाकरे बंधूंची जाहीर सभा झाली तर शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवारी नाशिक मध्ये सभा घेणार आहे नाशिक मधील गोदावरी किनारी मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी विकासाचा मुद्दा मांडला होता आणि त्यावरती नाशिक महानगरपालिकेची सत्ता काबीज केली होती यावेळी मुख्यमंत्री नाशिककरांना कोणती साद घालतात आणि महानगरपालिके वरती विजय मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नागरिकांनी या जाहीर सभेसाठी गोदावरी किनारी भाजी पटांगण येथे उपस्थित रहावे असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, सुनील देसाई, नाना शिलेदार, गोविंद बोरसे पवन भगूरकर, प्रशांत जाधव, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV