छ. संभाजीनगर - गणोरीत ४२ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। गणोरी जिल्हा परिषद गटात (ता.फुलंब्री) येथील सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मंजूर झालेल्या एकूण ४२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये ३६ कोटी रु
गणोरी जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा शुभारंभ


छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। गणोरी जिल्हा परिषद गटात (ता.फुलंब्री) येथील सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मंजूर झालेल्या एकूण ४२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये ३६ कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा, तर ६ कोटी रुपये निधीतून पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

आमदार नुराधा चव्हाण म्हणाल्या यामध्ये पिंपळगाव वळण (ता.फुलंब्री) येथे केंद्रीय मार्ग (CRF) निधीतून देवगिरी साखर कारखाना ते आडगाव, वाहेगाव, निधोना, गौर पिंप्री या गावांना जोडणाऱ्या व फुलंब्री-कन्नड तालुक्यांना जोडणाऱ्या सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या (२५ कोटी) कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. कारखान्याकडे जाणारा हा रस्ता झाल्यामुळे ऊस वाहतुकीसाठी त्याचा मोठा फायदा होणार असून शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विकासाच्या या कामांमुळे गणोरी व बाबरा गटासह संपूर्ण परिसराच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा आमचा विश्वास आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande