
स्वीकृत सदस्य म्हणून प्रकाश पोरवाल व अनिरुद्ध पांडे यांची निवड
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।मानवत नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी डॉ. अंकुश लाड यांचा एकमेव दावा प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड पिठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केली.
नगराध्यक्ष तथा पिठासन अधिकारी राणी लाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी कोमल सावरे उपस्थित होत्या. नगरपालिकेतील संख्याबळ व तांत्रिक बाबींचा विचार करून पुढील निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली.
यावेळी स्वीकृत सदस्यांची घोषणा करण्यात आली. स्वीकृत सदस्य पदासाठी प्रकाश पोरवाल, ऍड. अनिरुद्ध पांडे व चिंचोड अन्सारी मतीन तखी अशी तीन नामनिर्देशने समोर आली होती. मात्र नगरपालिकेतील राजकीय समिकरणांचा विचार केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश पोरवाल व ऍड. अनिरुद्ध पांडे यांच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती पिठासन अधिकाऱ्यांनी दिली.
या निवड प्रक्रियेच्या सभेला नगरसेवक राजकुमार खरात, नियमत खान पठाण, संजयबागड, किशोर लाड, तसेच नगरसेविका अनुराधा राजेश वासुंबे, ज्योती विष्णू आळसपुरे, नंदिनी गणेश मोरे, द्वारका दत्ता चौधरी, वृषाली विनोद रहाटे, मीरा मोहन लाड, रेखा बाजीराव हलनोर, भाग्यश्री स्वप्निल शिंदे, सुशीला बालाजी लाड, रूपाली गणेश उगले, डॉ. देवयानी राजेश दहे, गटनेते दीपक बारहाते, अॅड. विक्रमसिंग दहे, शैलेंद्र कत्रुवर, मो. बिलाल मो. युनूस, शेख जावेरिया बेगम व विभा भदर्गे आदी नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, डॉ. राजेश्वर दहे, स्वप्नील शिंदे, विष्णू अळसपुरे, मोहन लाड, विनोद रहाटे, राजेश वासुंबे व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, , ज्येष्ठ नागरिक व नगरवासीय उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis