


अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.)
विदर्भात एकमेव वीस भाजपा सदस्य निवडून आलेल्या धामणगाव नगरपरिषदेमध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा वकील व डॉक्टर यांना स्वीकृत सदस्यांमध्ये बहुमान मिळाला आहेधामणगाव रेल्वे नगरपरिषद येथे नगराध्यक्ष अर्चनाताई अडसड रोठे व वीस ही सदस्य भाजपाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात निवडून आले आहे.स्वीकृत सदस्यासाठी अनेक ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांची निवड होते मात्र धामणगाव नगरपरिषदेने एक पाऊल पुढे टाकत ऍड रीना मनोज व्यास व वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले डॉ. असीतकुमार पसारी यांना स्वीकृत सदस्य म्हणून बहुमान दिला आहे. चांदुर रेल्वे नगरपरिषदेमध्ये भाजपाचे अकरा सदस्य निवडून आले. येथेही वैद्यकीय क्षेत्राला अधिक महत्त्व दिले आहे येथील स्वीकृत सदस्यम्हणून डॉ.सुभाष पणपालिया यांची नियुक्ती केली आहे. महिला वकील व डॉक्टर यांना स्वीकृत सदस्य पदी बहुमान देणारी ही जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ,पहिलीच नगरपरिषद असल्याचे नगरपरिषद प्रशासनातील सहाय्यक आयुक्त विकास खंडारे यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी