भारतीय डाक विभागाकडून फ्रँचायझीसाठी मागवले प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। भारतीय डाक विभागाकडून खासगी व्यक्तींना फ्रँचायझी आउटलेट चालविण्याची उत्कृष्ट व्यवसाय संधी देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेअंतर्गत फ्रँचायझीधारकांना सर्व प्रकारच्य
भारतीय डाक विभागाकडून फ्रँचायझीसाठी मागवले प्रस्ताव


छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। भारतीय डाक विभागाकडून खासगी व्यक्तींना फ्रँचायझी आउटलेट चालविण्याची उत्कृष्ट व्यवसाय संधी देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

योजनेअंतर्गत फ्रँचायझीधारकांना सर्व प्रकारच्या डाक वस्तूंचे बुकिंग करण्याचा अधिकार देण्यात येईल. यासाठी दैनिक व मासिक स्वरुपात आकर्षक कमिशन मिळेल. कमी गुंतवणुकीत आणि शासकीय पाठबळासह हा व्यवसाय स्थिर व विश्वासार्ह उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो, असे विभागाकडून नमूद करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश सेवांचा विस्तार करणे, नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा देणे हा आहे.

इच्छुक कुरिअर सेवा पुरवठादार व व्यक्तींनी आपले अर्ज प्रवर डाक अधीक्षक छत्रपती संभाजीनगर टपाल विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवावे, अधिक माहितीसाठी ०२४० २९७०६१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आउटलेट चालविण्यासाठी आवश्यक ते आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande