जी. डी. सी. अॅन्ड ए. व सी. एच. एम, परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)। शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. अॅन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी (जी. डी. सी. अॅन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दिनांक 26, 27 व 28 में 2026 रोजी घेण्य
जी. डी. सी. अॅन्ड ए. व सी. एच. एम, परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन


सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)। शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. अॅन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी (जी. डी. सी. अॅन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दिनांक 26, 27 व 28 में 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जhttps://gdca.maharashtra.gov.inकरण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. परिक्षार्थीसाठी लागणारी आवश्यक अर्हत्ता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, शुल्क, परिक्षेच्या अटी व नियम, सूट व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसुचना खात्याच्याhttps://sahakarayukta.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दिनांक 09 जानेवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करता येतील. अर्ज भरताना तयार केलेला स्वत:चा User ID व Password परिक्षार्थ्यांनी परिक्षेचा निकाल प्रसिध्द होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करुन ठेवणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजाला, ई ब्लॉक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था किरण गायकवाड यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande