
बीड, 10 जानेवारी (हिं.स.)।
अंबाजोगाई येथील श्री गणपती मंदिर ट्रस्ट, चौभारा यांच्या वतीने २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रबोधनपर कार्यक्रम, गणेशयाग, पालखी सोहळा आणि महाप्रसाद वाटपाचा समावेश आहे.
या उपक्रमांच्या तयारीसाठी मंगळवारी मंदिर परिसरात बैठक झाली. बैठकीत सर्व पदाधिकारी आणि भाविक भक्त सहभागी झाले. चर्चेतून कार्यक्रमांचे स्वरूप ठरवण्यात आले. जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे ठरले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis