इगतपुरीत ९ कोटी ७१ लाख किमतीचा प्रतिबंधित पदार्थ साठा जप्त
इगतपुरी, 10 जानेवारी (हिं.स.)। - राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, यांच्या मार्गदर्शनाने राज्यात विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली
९ कोटी ७१ लाख किमतीचा


इगतपुरी, 10 जानेवारी (हिं.स.)।

- राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, यांच्या मार्गदर्शनाने राज्यात विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकाने व नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मनीष सानप आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ७ व ८ जानेवारीला नाशिक जिल्ह्यात ३ प्रतिबंधित अन्न पदार्थाची कारवाई केली. यामध्ये सुमारे ९ कोटी ७१ लाख २ हजार ३६५ रुपये किमतीचा साठा ताब्यात घेऊन ११ जणांविरुद्ध भारतीय न्याय सहिता व अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

ही मोहीम नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) मनिष सानप व विशेष पथकाचे प्रमुख यदुराज दहातोंडे, सहायक आयुक्त (अन्न ) भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकारी गजानन गोरे, अशोक इलागेर, अन्न सुरक्षा अधिकारी यांचे समवेत नाशिक विभाग पथकातील विनोद धवड (सहा आयुक्त अन्न), गोपाळ कासार, गोविंद गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने केली.

८ जानेवारीला इलाईटक़ॉन इंटरनॅशनल लिमिटेड, तळेगाव, दिंडोरी येथे घेण्यात आलेल्या कारवाई नुसार दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ह्या कारवाईत मे. गोल्डन क्रायो प्रायवेट लिमिटेड, गट नं. ३९५, पाडळी देशमुख, पाडळी फाटा, ता. इगतपुरी या आस्थापनेने उत्पादित केलेले ५०८ बॉक्स काश प्रेमिक्स शीशा कंटेनिंग सुगंधित तंबाखू हा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला होता. त्यानुसार ९ जानेवारीला एलसीबी पोलीस पथक व वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन पथक समवेत मे. गोल्डन क्रायो प्रायवेट लिमिटेड, गट नं. ३९५, पाडळी देशमुख, पाडळी फाटा, ता. इगतपुरी या सिगारेट उत्पादक कंपनीची तपासणी केली. तपासणी वेळी ह्या आस्थापानेमध्ये १) सिगारेट पॅकींग केलेले अंदाजे २ हजार बॉक्स २) पॅकींग मशीन (Tipco) ३) विना लेबल असलेले सिल्वर पॅकिंग ४० रोल ४) HI PACK पॅकिंग मशीन ५) विना सुंगंधी रॉ तंबाखू प्लास्टिक अंदाजे २०० गोण्या आढळून आल्या. हे पॅकींग मशीन (Tipco), विना लेबल असलेले सिल्वर पेंकिंग ४० रोल व HI PACK पॅकिंग मशीन हे प्रतिबंधित अन्न पदार्थाची म्हणजे सुगंधित तंबाखूची निर्मिती होऊ नये म्हणून सील बंद करण्यात आले. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत मशीनचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री, उत्पादन, साठा किंवा वाहतूक यासंबधीत आपणाकडे माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ या क्रमांक संपर्क साधावा अथवा कार्यालयात येवून माहिती द्यावी. आपले नाव गुप्त ठेवले जाईल. अशा प्रकारच्या अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना कळविण्यात येते की, सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री, उत्पादन, साठा किंवा वाहतूक करू नये अन्यथा त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन सह आयुक्त (अन्न) मनिष सानप यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande