परभणी - आ. विटेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गौंडगाव-उमरा-अंधापुरी ग्रुप सोसायटीचे चेअरमन विठ्ठल नाना कोल्हे, तसेच मसला येथील युवक पदाधिकारी वसंत पवार व
आमदार विटेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गौंडगाव-उमरा-अंधापुरी ग्रुप सोसायटीचे चेअरमन विठ्ठल नाना कोल्हे, तसेच मसला येथील युवक पदाधिकारी वसंत पवार व ज्ञानेश्वर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी दादासाहेब टेंगसे, संजय काका रणेर, कल्याणराव हिके दाजी, भागवत पानपते, चंद्रकांत गिराम, गोविंद रणेर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande