छ. संभाजीनगरात मतदार जागृतीसाठी 'एलईडी' चित्ररथ व पथनाट्यांचे सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेने तयारी केली आहे. त्यासाठी पाच ''एलईडी'' चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पथनाट्याचे सादरीकरण देखील करण्यात य
छ. संभाजीनगरात मतदार जागृतीसाठी 'एलईडी' चित्ररथ व पथनाट्यांचे सादरीकरण


छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेने तयारी केली आहे. त्यासाठी पाच 'एलईडी' चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पथनाट्याचे सादरीकरण देखील करण्यात येत आहे.''

पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी निवडणूक जनजागृती कक्ष सुरु करण्यात आला आहे.

या कक्षाच्या माध्यमातून पाच 'एलईडी' चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. पालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात चित्ररथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून मतदानाचे महत्व मांडण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. बाजारपेठा, वर्दळीचीठिकाणे आणि विविध वसाहतींमध्ये हे रथ फिरवण्यात येणार आहेत.

मतदानाचा टप्पा वाढावा यासाठी स्वीप टीमच्या माध्यमातून महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात येत आहे. उस्मानपुरा येथील पालिकेच्या सीबीएसई शाळेतील मुले पथनाट्यात सहभागी होत आहेत. स्वीप टीमचे सदस्य संजीव सोनार, गोविंद बाराबोटे, शशिकांत उबाळे, विजय कोल्हे, संजय कुलकर्णी, अर्पिता शरद, शली निर्मल आदी सदस्य पथनाट्य सादरीकरणासाठी प्रयत्न करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande