आयमा अध्यक्षपदासाठी ललित बुब यांची बिनविरोध निवड
नाशिक, 10 जानेवारी (हिं.स.)। अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चररर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडत असून अध्यक्ष पदासाठी ललित बुब याच्या नावाला संमती मिळाली आहे. माजी अध्यक्ष यांच्या झालेल्या बैठकीत त्यांच्य
आयमा अध्यक्षपदासाठी ललित बुब यांची बिनविरोध निवड


नाशिक, 10 जानेवारी (हिं.स.)। अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चररर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडत असून अध्यक्ष पदासाठी ललित बुब याच्या नावाला संमती मिळाली आहे. माजी अध्यक्ष यांच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाला मान्यता दिली असल्याचे आयमाचे बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी माहिती दिली.

आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांचे मागील दोन वर्षातील बीटूबी, नाशिक बिसनेस मीट, आयमा इंडेक्स २५ औद्योगिक प्रदर्शन , जॉब फेअर, नाशिकमध्ये गुंतवणूक यावी यासाठी केलेले प्रयत्न, तसेच त्यांचा एकमताने कार्याचा आढावा घेऊन व संस्थेसाठी व उद्योजकांसाठी केलेल्या कामांची दखल घेऊन पुढील दोन वर्षासाठी त्यांनाच उमेदवारी देऊन अध्यक्षपदी ठेवावे असा निर्णय घेण्यात आला. आयमात याआधी झालेल्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी बैठकीत यास कार्यकारिणीने सहमती दर्शवली असल्याचे ज्ञानेश्वर गोपाळे यांनी सांगितले.

माजी अध्यक्ष यांच्या बैठकीत बिपीन बटाविया, विजय तलवार, जे एम पवार, धनंजय बेळे, वरून तलवार ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, योगेशभाई कानांनी,एस एस बिरदि होते,याव्यतिरिक्त बैठकीस उपस्थित नसलेल्या निखिल पांचाळ, जे आर वाघ, रमेश पवार, राजेंद्र अहिरे, सुरेश माळी, या माजी अध्यक्ष यांनीहि त्यांचेशी झालेल्या चर्चेप्रमाणे ललित बुब यांच्या नावास संमती दिसून आली आहे असे ज्ञानेश्वर गोपाळे यांनी सांगितले.

ललित बुब यांनी मागील दोन वर्षात औद्योगिक वसाहतीत पहिला शम्भर फुटी ध्वज उभारणी, कामगारांसाठी खेळांच्या सुविधा, विमान वाहतूक, कार्गो सेवा, एक्स्पोर्ट मॅनेजर प्रोग्रॅम, फॉरेन डेलिगेशन, वृक्षरोपण, महिला सशक्तीकरण व महिला उद्योजक घडवणे, विविध शासकीय अधिकारी व औद्योगिक संघटना यांचेशी संवाद साधने यासारखे अनेक उपक्रम आयमासाठी यशस्वी उपक्रम राबवले आहेत त्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उमेदवारी घोषित केल्याचे बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande