

बीड, 10 जानेवारी, (हिं.स.)। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पंढरपूर येथील रस्त्याचे काम देखील पूर्ण करण्याचा शब्द आज मुख्यमंत्री महोदयांनी दिला; त्याबद्दल गडाचा एक भक्त व सेवेकरी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
वारकरी संप्रदायातील महान विभूती, वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे परंपरेनुसार महापूजेस उपस्थित राहून भक्तीमय वातावरणात महापूजा व आरती करून श्री गहिनीनाथांचे, संत वामनभाऊंचे तसेच गडाचे महंत ह. भ. प. श्री विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
आमदार धनंजय मुंडे यांनी काल्याचे कीर्तन श्रवण करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.
श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील विविध प्रस्तावित विकास कामे महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत असून गडाच्या पंढरपूर येथील रस्त्याचे काम देखील पूर्ण करण्याचा शब्द आज मुख्यमंत्री महोदयांनी दिला; त्याबद्दल गडाचा एक भक्त व सेवेकरी म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे आमदार मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
व्यासपीठावर देवेंद्र भाऊ यांच्यासह मंत्री तथा पंकजा मुंडे, आजी - माजी आमदार, संत महंत, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis