
सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोग,यांचेमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025ही दि.11जानेवारी2026रोजी सकाळी11वा. ते12वा. या वेळेत सोलापूर शहरातील खाली नमुद14परीक्षा उपकेंद्रांवर होणार आहे. सदर परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स सेंटर,फॅक्स,ईमेल,रेडिओ,इंटरनेट अशा दळणवळण सुविधा यांचा परीक्षेच्या अनुषंगाने गैरवापर होण्याची शक्यता आहे,अशा सुविधा कार्यरत ठेवणे,वायरलेस सेट,ट्रांझिटर,मोबाईल फोन,टॅबलेट,इलेक्ट्रॉनिक घड्याळ,संगणक गणनायंत्र (कॅल्क्युलेटर),ई-मेल,इंटरनेट,झेरॉक्स सेंटर यासारख्या दळणवळण साधनांचा परीक्षा केंद्राच्या आवारात उपयोग केला जातो. तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत नसलेली व्यक्तीं परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करणे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे,परीक्षार्थीना कोणताही अडथळा होऊ नये आणि परीक्षा प्रक्रियेशी संबधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्ये चोखपणे,कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून परीक्षा केंद्राच्या सभोवताली100मीटर परीसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023चे कलम163चा आदेश लागू करणे निकडीचे असल्याने पोलीस उप आयुक्त, (गुन्हे/विशा), डॉ. अश्विनी पाटील,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023चे कलम163अन्वये यांनी आदेश दिला की,दिनांक11जानेवारी2026रोजी सकाळी8वा. ते दुपारी13 वा. पर्यंत पोलीस आयुक्तालय,सोलापूर शहर हद्दीचे कार्यक्षेत्रातील खाली नमुद सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रापासून100मीटर परिसरात खालील कृती करण्यास बंदी घालत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड