
सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)। आजच्या युवकांच्या हाती उद्याच्या भारताचे भवितव्य असून हे युवक समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. कायदा हा लोकशाहीचा कणा असून आजच्या युवकांनी कायदेदूत म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर यांनी केले.
युवादिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा हे होते.
राष्ट्रीय युवादिनाच्या निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित निबंधस्पर्धेत गायत्री मेट्रे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक अक्षता शिवशरण, तृतीय क्रमांक समीक्षा थोरा, उतेजनार्थ सानिया नायडू व कर्तव्या बाल सराफ यांनी पटकविले. विजेत्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. मतदान करून लोकशाही बळकट करा, असे आवाहन राष्ट्रीय मतदारदिनाविषयी बोलताना अॅड. सरोजिनी तमशेट्टी यांनी केले. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड