
येवला, 10 जानेवारी (हिं.स.) : तालुक्यातील नगरसुल येथे एका हरणाच्या पाडसाचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास नगरसुल येथे साईनाथ मोरे गेट नंबर 799 भागुबाई रामा मोरे बोढरे वस्ती रेल्वे लाईन जवळ साईनाथ मोरे यांना विहिरीमध्ये हरणाचे पिल्लू पडल्याचे सकाळी आढळून आले. त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहचून जाळे टाकून हरणाच्या पिल्लाला बाहेर काढले, परंतु पाडस विहिरीतच अंत झाल्याचे आढळून आले. अशा दुर्दैवी घटनां टाळण्यासाठी विहिरींना मोठे कठडे किंवा झाकण बसवणे आवश्यक आहे. वनविभागाने या बाबतीत अधिक जागरूकता निर्माण करायला हवी, असे स्थानिक निवासींचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV