
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाच्या १४ जुलै २०२५ च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातून देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी सादर करावे. परंतु ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल,अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल,अशी माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु