परभणीचा महापौर राष्ट्रवादीचाच : सुनील तटकरे
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणूकीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नंबर 1 चा पक्ष राहील व महापालिकेवर राष्ट्रवादीचाच महापौर आरुढ होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त
परभणीचा महापौर राष्ट्रवादीचाच : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे प्रतिपादन :


परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणूकीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नंबर 1 चा पक्ष राहील व महापालिकेवर राष्ट्रवादीचाच महापौर आरुढ होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

महानगरपालिकेंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या ठिकठिकाणी कॉर्नर सभा झाल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी, पदाधिकारी व त्या त्या प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष असा पक्ष आहे. सामाजिक समता राखणारा पक्ष आहे. या पक्षाने एनडीएच्या माध्यमातून, अर्थसंकल्पातून सातत्याने समाजकल्याण उपयोगी योजनांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली. विशेषतः कधी नव्हे एवढा अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांकरीता सुमारे 1 हजार कोटींची तरतूद केली. तसेच अन्य महत्वाकांक्षी योजनांकरीताही भरघोस अशी तरतूद केली.

या निवडणूकीच्या माध्यमातून परभणीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ताकद उभारावी, राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री हे निश्‍चितच परभणीच्या विकासाकरीता राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेतून कोट्यवधींचा निधी खेचून आणून शकतील, महापालिका प्रशासन गतीमान व्हावे, या दृष्टीनेही पराकाष्टा करतील, असे नमूद करीत तटकरे यांनी प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या कारकिर्दीत राष्ट्रवादीने या महापालिकेस भरघोस अशी आर्थिक तरतूद उपलब्ध केली. त्यामुळे विकासाला गती मिळाली, परंतु, मध्यंतरी राष्ट्रवादी सत्तेबाहेर राहीला. त्यामुळे महानगरपालिकेंतर्गत विकासाची प्रक्रिया खुंटली. परंतु, यावेळी महापालिकेच्या या निवडणूकीतून परभणीकर राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करतील, असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande