
रत्नागिरी, 10 जानेवारी, (हिं. स.) गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पसायदान पुरस्काराकरिता प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गुहागर येथे २०१४ पासून पसायदान प्रतिष्ठानतर्फे पसायदान राज्यस्तरिय काव्यपुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यावर्षी कवितासंग्रह, कथा आणि कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी विषयाचे बंधन नाही. मान्यवर समीक्षकांच्या समितीद्वारे योग्य प्रत्येकी एक कवितासंग्रहाची, कथासंग्रहाची आणि कादंबरीची निवड पुरस्कारासाठी केली जाईल.
काव्यपुरस्कारासाठी ३००० हजार रुपये, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट पुरस्कारासाठी ३००० रुपये आणि भारत सासणे कथालेखन पुरस्कारासाठी एका कथासंग्रहास ३००० रुपयांचे पारितोषिक, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल.
सर्व कवी आणि व लेखकांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपापल्या प्रकारातील साहित्यप्रकाराच्या प्रत्येकी दोन प्रती, मोबाइल क्रमांक १०मार्च २०२६ पर्यंत पाठवाव्यात. फोटो पाठवू नये, परीक्षणानंतर पुरस्कारासाठी पाठवलेली पुस्तके परत पाठवली जाणार नाहीत. ती पुस्तके ग्रंथालयांना भेट दिली जातील. पुरस्कार निवड झालेल्या साहित्यिकांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः हजर राहायचे आहे. पुरस्कार पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवला जाणार नाही.
पुरस्कारासाठी पुस्तके डॉ. बाळासाहेब लबडे, निळकंठ पार्क अ 103, मु. पो. शृंगारतळी; ता. गुहागर, जि. रत्नागिरी-४१५७२४ या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी बाळासाहेब लबडे (9145473378) यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी