पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट
सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज
Kadadi


सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.

महानगरपालिका निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिला. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शरणराज काडादी, पुष्पराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी धर्मराज काडादी यांना भेटण्यासाठी गंगा निवास गाठले. यावेळी धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी दोघांमध्ये ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेबाबत तसेच महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष आणि विशेषतः लिंगायत समाजात मोठे प्रस्थ असलेले धर्मराज काडादी यांची भेट घेतल्यामुळे शहरात मोठ्या संख्येने असलेल्या धर्मराज काडादी यांच्या समर्थकांमध्ये समाधानाची भावना असून धर्मराज काडादी यांना मानणारे हजारो सोलापूरकर याबाबत आनंद व्यक्त करत आहेत. याप्रसंगी प्रभुराज मैंदर्गीकर, अक्षय अंजिखाने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande