
सोलापूर, 10 जानेवारी, (हिं.स.)। महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येणार आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपलं पारडं जड केलं असून होम टू होम प्रचारावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या दोन्ही उमेदवाराला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे घरोघरी औक्षण करून त्यांचे स्वागत केले जात असल्याचे पाहायला मिळते.धनंजय रामचंद्र कारंडे व शोभा प्रभाकर चौगुले यांनी विरोधकांसमोर आपले तगडे आव्हान उभे केले आहे.
प्रचारादरम्यान राघवेंद्र नगर, मजरेवाडी, बागेघर वसाहत या ठिकाणी उमेदवार धनंजय कारंडे आणि शोभा चौगुले यांना यांचे परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि मनोभावे स्वागत करत औक्षण केले. मतदारांचे प्रेम पाहून धनंजय कारंडे यांनी हेच आमच्या विजयाची नांदी असेल असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड