
सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
महापालिका निवडणूक लढवणाऱ्या सर्वपक्षीय ५६४ उमेदवारांची शपथपत्रे सात दिवसानंतर ऑनलाईन जाहीर झालेली नव्हती. यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केल्यानंतर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही शपथपत्रे महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड झाली. राज्य निवडणूक आयोग आणि महापालिकेने गेल्या सात दिवसात सामान्य मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन केल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
महापालिकेच्या गत निवडणुकीत अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन होती. यंदा ही प्रक्रिया ऑफलाइन झाली. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन अपलोड करुन घेतले नाहीत. त्यामुळे ऑफलाइन प्रक्रिया सुरू राहिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २ जानेवारी होता. त्यानंतर ३ जानेवारी रोजी आयोगाकडून निवडणूक रात्री उशीरा ११,३० वा. अपलोड झालेली माहिती सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुरुवारी पालिकेला शपथपत्रे मिळाली. गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या वेबसाइटवर ही शपथपत्रे अपलोड करण्याचे काम सुरू होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड