छ. संभाजीनगर : सर्पमित्रांनी दोन अजगरांना दिले जीवदान
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहर शेंद्रा औद्योगिक परिसरातील एका कंपनीत दोन अजगर आढळून आले. नर व मादी असलेल्या व आकाराने मोठे असलेल्या या अजगरांना सर्पमित्रांनी अथक प्रयत्न करत रेस्क्यू केले. कामगारांना कंपनी परिसरात
सर्पमित्रांनी अथक प्रयत्न करत दोन्ही अजगरांना सुरक्षितपणे पकडले


छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहर शेंद्रा औद्योगिक परिसरातील एका कंपनीत दोन अजगर आढळून आले. नर व मादी असलेल्या व आकाराने मोठे असलेल्या या अजगरांना सर्पमित्रांनी अथक प्रयत्न करत रेस्क्यू केले.

कामगारांना कंपनी परिसरात अजगराची जोडी असल्याचे निदर्शनास येताच कंपनीच्या सुरक्षा दल कर्मचारी शिवाजी बोर्डे आणि ताराचंद्र चव्हाण यांनी तातडीने सर्पमित्र नितेश जाधव यांना संपर्क साधला. सर्पमित्रांनी तातडीने कंपनीच्या दिशेने धाव घेतली. याच दरम्यान, दोन्ही अजगर परिसरात दडून बसले होते. सूमारे एक तास शोध घेतल्यानंतर नर व मादी अजगर आढळून आले. सर्पमित्रांनी अथक प्रयत्न करत दोन्ही अजगरांना सुरक्षितपणे पकडले.

नर अजगराची लांबी १२ फूट तर मादी अजगर सूमारे १० लांबीचा असल्याचे सर्पमित्र जाधव यांनी सांगितले. मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक, वनपाल आप्पासाहेब तागड व वनरक्षक अशोक साबळे यांच्या उपस्थितीत सर्पमित्र नितेश जाधव, शरद दाभाडे, रवी मांडलिक, आनंद वाघमारे, अमोल सोनवणे यांनी दोन्ही अजगराना सुरक्षित अधिवासात सोडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande