
नाशिक, 10 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीमध्ये राकपाचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा प्रचार सुरू झाल्यानंतर मित्रपक्ष शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही त्यांच्या सभांची मागणी होऊ लागली आहे . राज्यामध्ये सत्तेत असलेल्या राकपा अजित पवार, शिवसेना शिंदे गट, आणि भाजपा असले तरी नाशिकमध्ये मात्र आता वेगळे चित्र उभे राहिले आहेत.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झालेली आहे आणि या युतीतून उमेदवार देखील उभे केले गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सध्या आजारी आहेत डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून सर्व प्रचाराची यंत्रणा आणि प्रचारात माजी खासदार समीर भुजबळ हे आघाडी घेत आहेत सर्वत्र शहरांमध्ये त्यांच्या प्रचार सभा सुरू झाले आहेत पण आता जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तस तशी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाकडून माजी खासदार समीर भुजबळ हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी देखील त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर ती मागणी होत आहे. त्यामुळे नाशिकच्या प्रचारात माजी खासदार समीर भुजबळ हे स्टार प्रचारक म्हणून पुढे येत आहे.
शिंदे सेनेचे उमेदवार स्टार प्रचारकाच्या प्रतीक्षेत
भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मातब्बर माजी नगरसेवकांविरोधात सगळे आवाहन दिले आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. त्यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कोणीही स्टार प्रचारक उपलब्ध नाही इतर मंत्री आणि नेत्यांनी आपल्या शहरातील महानगरपालिकांमध्ये लक्ष घातल्यामुळे शिंदे गटाकडे प्रचाराला कोणी नसल्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाच्या अनेक उमेदवारांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या कडे मदत मागितली आहे यामुळे उमेदवारांना मित्र पक्षाच्या नेता प्रचारासाठी तर मिळतच आहे परंतु त्याबरोबर शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा असलेला नेता प्रचाराला येत असल्यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवारांमध्ये काहीसा विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV