पुणे - स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित
पुणे, 10 जानेवारी, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३२ प्रभागांकरिता प्रत्येक ४ निवडणूक प्रभागांमागे १ याप्रमाणे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली
पुणे - स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित


पुणे, 10 जानेवारी, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३२ प्रभागांकरिता प्रत्येक ४ निवडणूक प्रभागांमागे १ याप्रमाणे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून,मतदानापूर्वी मतदान साहित्याचे वाटप तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम व संबंधित साहित्याची स्वीकृती करण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

या मतदान व मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आलेली असून,या सर्व ठिकाणांना पोलीस विभागाकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झालेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande