इस्कॉनच्या मधुबन केंद्रात भागवत कथेला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील इस्कॉनच्या अदालत रोडवरील मधुबन केंद्रात भागवत कथेला मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. वक्ते सर्वभौम प्रभुजी यांच्या कथेसाठी भाविकांनी गर्दी केली आहे. कथा महोत्सवासाठी मधु
इस्कॉनच्या मधुबन केंद्रात भागवत कथेला सुरुवात


छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर येथील

इस्कॉनच्या अदालत रोडवरील मधुबन केंद्रात भागवत कथेला मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. वक्ते सर्वभौम प्रभुजी यांच्या कथेसाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

कथा महोत्सवासाठी मधुबन प्रांगण सुंदर रांगोळी व फुलांनी सजवण्यात आले होते. प्रांगणात आगमन होताच, वक्ते सर्वभौम प्रभुजी यांचे स्वागत सुंदर फुलांच्या छत्रीने करण्यात आले आणि कथेचे यजमान डॉ. मनोहर अग्रवाल कुटुंबाने श्रीमद् भागवत ग्रंथाची पूजा केली.

सर्वभौम प्रभुंनी श्रीमद् भागवत ग्रंथाची भूमिका स्पष्ट केली. जसे भगवद् गीता ही भगवान श्रीकृष्णाची जीवनासाठीची शिकवण आहे. त्याचे वाचन दिशा देते आणि देवाबद्दल आदर वाढवते. तसेच भागवत ग्रंथ ही भगवान श्रीकृष्णाच्या

२४ अवतारांची कथा आहे, जे ऐकल्याने देवाबद्दल प्रेम निर्माण होते. भागवत ग्रंथ हा एक आध्यात्मिक दिवा आहे जो संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचू शकतो आणि चेतना प्रकाशित करू शकतो.

ही कथा प्रथम भगवान शिव यांनी

माता पार्वतीला, नंतर सुखदेव गोस्वामी यांनी महाराज परीक्षितांना सांगितली. तिथून ते ऐकल्यानंतर सूत गोस्वामींनी नैमिषारण्यमधील ऋषींना त्याचे कथन केले आणि तिथून त्याची लोकप्रियता कायम राहिली, याकडे सार्वभौम प्रभुनी लक्ष वेधले. कथेनंतरसर्वांना महाप्रसाद वाटण्यात आला, ज्याचा सर्वांना आनंद झाला. पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी कथेत सहभाग घेतला. या कथेसाठी कैलास खंडेलवाल, मीना पोटभरे, रिता मेती, महानंद प्रभू, मधुमिता माताजी आदींनी पुढाकार घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande