
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। गंगापूर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर होणार पहिली मासिक सभा १६ जानेवारी रोजी होणार असून यामध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.
येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जाधव यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली असून वीस पैकी राष्ट्रवादी काँग्रेस ११, भाजप सात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, अपक्ष एक असे नगरसेवक निवडून आले आहेत. येथील नगरपरिषदेच्या निकालानंतर १६ जानेवारी रोजी पहिली मासिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे यासाठी अनेक नावे चर्चेत उपनगराध्यक्षपद मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. स्वीकृतसदस्यपदी काही पराभूत नगरसेवक उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेची पहिली मासिक सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड दुपारी अडीच वाजता जाहीर केली जाणार असून दोन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. येथील नगरपरिषद मधील संख्याबळानुसार एक स्वीकृत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस तर एक स्वीकृत नगरसेवक भाजपाकडून निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदांसाठी दोन्ही पक्षातील इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी अमोल जगताप, सोनाली पाटील, सोपान देशमुख, सय्यद अख्तर, संतोष आंबिलवादे आदी इच्छुक आहेत. स्वीकृत सदस्यासाठी सुवर्णा जाधव, राहुल वानखेडे, योगेश राजपूत, तुकाराम सटाले, बिजला साबणे, प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, प्रशांत मुळे आदींच्या नावांची चर्चा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis