
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीवर शहरातील संत गाडगेबाबा नगरवासीयांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे
महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मधील श्री संत गाडगेबाबा नगरातील नागरीकांनी रहिवाशांच्या प्रत्येकाच्या नावानिशी रजिस्ट्री व पीआरकार्ड त्वरित वितरित करावे, अन्यथा मतदानाच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा सर्वानुमते निर्धार जाहीर केला आहे.
या भागातील या नागरीकांनी यापूर्वी सातत्याने प्रशासनाकडे प्रत्येकाच्या नावानिशी रजिस्ट्री व पीआरकार्ड वितरित करण्या संदर्भात भक्कम असा पाठपुरावा केला. परंतु, आश्वासनांपलिकडे फार काही मिळाले नाही. त्यामुळे या संतप्त नागरीकांनी महापालिका निवडणूकीचे औचित्य साधून मतदानाच्या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्धार जाहीर केला. प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा या पध्दतीची कृती केली जाईल, असा इशारा या नागरीकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis