स्वार्थासाठी भाजपचा उपयोग करणाऱ्यांना पदमुक्त करा, नांदगावातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मागणी
मनमाड, 10 जानेवारी (हिं.स.)। - नांदगाव नगरपालिका निवडणुकीत स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाचे नुकसान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष यतीन कदम व आमदार राहुल आहेर यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केली आहे आमद
स्वार्थासाठी भाजपच्या उपयोग करणाऱ्यांना


मनमाड, 10 जानेवारी (हिं.स.)।

- नांदगाव नगरपालिका निवडणुकीत स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाचे नुकसान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष यतीन कदम व आमदार राहुल आहेर यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केली आहे आमदार डॉ राहुल आहेर व जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांना भेट देऊन स्थानिक भाजपचे कार्यकर्ते यांनी केलेले प्रकार सांगून पक्षविरोधी काम करणाऱ्याना पक्षातुन काढून टाकावे आशु मागणी करण्यात आली.

नांदगाव नगरपालिकेची निवडणूक पार पडली त्यात पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दोन जागेसाठी युती करून भारतीय जनता पार्टीचे नुकसान करणाऱ्या मंडल अध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांना पदमुक्त करावे अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केली दत्तराज छाजेड यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला असताना पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली याची पक्षाने नोंद घ्यावी व त्यांच्येवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे आमदार डॉ राहुल आहेर व जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याकडे केली.

निवेदनावर माजी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर . माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात मा. तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, अभय निकम अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या असून त्यांनी सानप व छाजेड यांना पद मुक्त करावे अशी मागणी केलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande