विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात - वैशाली देशमुख
लातूर, 10 जानेवारी, (हिं.स.)। विरोधक दरवर्षी दोन कोटी नोक-या देतो म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रूपये टाकतो म्हणाले, पण लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नसते. तर दुसरीकडे लोकनेते विलासराव देशमुखसाहेबांनी लातूरसाठी खूप योजना आणून चौफेर विकास
विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख


लातूर, 10 जानेवारी, (हिं.स.)। विरोधक दरवर्षी दोन कोटी नोक-या देतो म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रूपये टाकतो म्हणाले, पण लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नसते. तर दुसरीकडे लोकनेते विलासराव देशमुखसाहेबांनी लातूरसाठी खूप योजना आणून चौफेर विकास केला. अन् कांही लोक त्यांचे नाव पुसणार म्हणात. तुम्ही काय नाव पुसणार, लोकनेते विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात कोरलेले आहेत, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी केले.

लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेस वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार स्वमी योगेश उमाकांत, शेख तबस्सुम मुख्तार, किसवे संपना पांडूरंग, सगरे एसआर जब्बार, तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील अमोल लांडगे, कमल सोमवंशी, शाहीन मनियार, बालासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला संवाद बैठकीत चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी जयश्री पाटील, राजेसाहेब सवई, प्रा. शिवाजी जवळगेकर, माधव गादेकर, तनुजा कांबळे, दत्ता सोमवंशी आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्याची दुरदृष्टी आणि कर्तृत्व हे वारसाने येत असते. ते आज कॉग्रेस पक्षाने गेल्या अनेक वर्षांतपासून लातूरचा विकास करताना दाखवून

दिलेले आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी घालून दिलेली विकासाची घडी विस्कटू न देता ती अधिक पक्की करण्याकरीता माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख काम करीत आहेत. लातूरला सुजलाम सुफलाम करायचे आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून महानगरपालेकेत पाठवायचे असल्याचे नमुद करून चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाची, आपल्या विचाराची माणसे महानगर पालिकेत पाठवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन मतदान करून काँग्रेस पक्षाच्या व आपल्या विचाराच्या उमेदवारांना विजयी करावे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी जयश्री पाटील म्हणाल्या या प्रभागात आपल्या उमेदवारांचे काम चांगले आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्व सक्षम करण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन केले. तसेच माधव गादेकर यांनी प्रकाश नगरचा पूर्व भाग पहिल्यापासून लोकनेते विलासराव देशमुख, आमदार अमित देशमुख यांच्या पाठीशी राहून मतदान केले आहे. तसेच या भागाला मदतही झाली आहे. विरोधक पैशाचे अमिष दाखवतील, पैशाला बळी न पडता आपल्यासाठी काम करणा-या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून निवडूण द्यावे, असे आवाहन केले. लातूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील छत्री या चिन्हाचे अपक्ष उमेदवार भिमराव जोगदंड यांचा काँग्रेस वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना जाहिर पांठीबा दिला असल्याचे नागेश जोगदंड यांनी यावेळी संवाद बैठकीत सांगीतले. त्यांचा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अॅड. अश्मिन शेख, सीमा इगवे, उर्मिला देशमुख, सुरेखा बेदरे, ज्योती धरणे, निर्मला धरणे, महानंदा घट्टे, शुभांगी रोड, हुमनाबादे, शिल्पा कापसे, मुन्नाताई स्वामी, सोनाली इगवे, माशाळकरताई, शांताबाई रोडे, कोरेताई, भोसलेताई, सुमनकरवारताई, रेश्माताई, मांतडेताइ, करंजेताई, काटेताई, शिवनंदाताई, स्वामीताई, नाईकवाडेताई यासह आदी महिला उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande